19/04/2008
एकटे असावे वाटते
बसावे शांत वाटते
वाटते ऐकू न यावे
सूर माझे मला वाटते
एक मैफिल संपलेली
रातराणी बहरलेली
चांदण्या रात्रीस या
बिलगून जावे वाटते
राग तू, अनुराग तू,
मोह कि वैराग्य तू
गूढ मनाच्या डोही या
बुडावे खोल, खोल वाटते
हले पाचोळा, फुले पिसारा
का अवेळी मुद्गंध आला
साचलेल्या जलाने या
कोसळावे वाटते ........... *
- आरती.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.