बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Tuesday, 22 November 2011

आपके PC मे कौन रेहता है ?!

काळाच्या पुढचे बघणाऱ्याला द्रष्टा (a seer / visionary ) म्हंटले जाते. काळाच्या थोडे पुढे जाऊन, आज घडणाऱ्या घटनांचे भविष्यात उमटणारे 'भयंकर' पडसाद ओळखणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना काय म्हणाल ? बरोबर, माझा निर्देश हिंदुत्ववादी संघटनांकडे आणि आपल्या आयुष्याचे दान देऊन संघटनेच्या उदिष्टपुर्ती साठी धडपडणाऱ्या 'कार्य'कर्त्यांकडे आहे.


वाढतच चाललेल्या दैनंदिन गरजा आणि सो कॉल्ड सामाजिक 'पत', आणि त्यासाठी लागणारा अधिक पैसा, या दुष्टचक्रात आजचा सुशिक्षित वर्ग सापडला आहे हे मान्य करावेच लागेल. आपल्या आजूबाजूला काय घडते आहे, त्याचे परिणाम काय असणार आहेत, इतका विचार करायला वेळ कुणाकडेच नाही. वर्तमानपत्रे, news channels यांच्यावर विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. सेक्युलर - नॉन सेक्युलर या टर्म्स  फक्त 'हिंदू' धर्मापुरत्या मर्यादित आहेत असेच वाटते.


मान्य आहे कि सगळ्यांनाच मैदानात उतरणे शक्य नसते. पण 'या' संघटना काय काम करतात, त्यांची उदिष्टे काय आहेत, त्या मागची कारणे काय आहेत, याचा सखोल अभ्यास / विचार करणे तर शक्य आहे. शून्य माहितीच्या आधारावर 'या' संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांना झोडपण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणावर केले जाते. काळजी वाटते या विचारसरणीची, काळजी वाटते या निक्ष्कालजी मनांची, काळजी वाटते या भिडस्त स्वभावाची, काळजी वाटते समोर उभ्या ठाकलेल्या 'संकटांना' जाणून घेण्याची इच्छा सुद्धा नसलेल्या अजाण समाजाची.


बरेचदा एखादा मुद्दा मांडताना उदाहरण देऊन सांगितले तर मतितार्थ लवकर लक्षात येतो. असेच एक रोजच्या जीवनातले उदाहरण घेऊन माझी भूमिका आणि माझे निरीक्षण इथे मांडायचा प्रयत्न केला आहे. बघा पटते आहे का ........


*


"आपके PC मे कौन रेहता है, व्हायरस या अँटी व्हायरस ?"

ईईई हा काय वेड्यासारखा प्रश्न आहे, असाच विचार आला ना तुमच्या मनात. माझी पण रोज-रोज अशीच चिड-चिड होते, कारण रोजच रेडीओ सिटीवर ही जाहिरात लागते आणि मी विचार करायला लागते अरे हे विचारावे का लागते आहे, किती साधे आणी सरळ उत्तर आहे या प्रश्णाचे.

असे माझे बरेचदा होते. म्हणजे माझ्या मनात अत्यंत स्पष्ट असलेल्या एखाद्या मुद्यावर जर कुणाला प्रश्ण पडला असेल तर मला खुपच अस्वस्थ वाटायला लागते. म्हणुन मी यावेळेस ठरवले, आपण काही 'प्रातीनिधिक' म्हणता येईल अशा 'व्यक्तीमत्वांशी' चर्चा करुया आणि जाणुन घेउया त्यांची उत्तरे काही वेगळी आहेत का ? आणि आहेत तर ती काय आहेत ? चला बघुया तुमच्या मनातल्या उत्तराशी जुळणारी आहेत की माझ्या ...........

एकः
हा काय प्रश्ण आहे ? व्हायरस, अँटी व्हायरस सगळी एकत्र एकाच PC मधे राहणारच. तुम्ही हे असले प्रश्ण विचारुन त्यांना वेगवेगळे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात. ताबडतोब बंद करा हे सगळे नाहीतर आम्ही खास व्हायरस साठी एका स्वतंत्र PC ची व्यवस्था करु.

दोनः
अँटीव्हायरस हा एक अत्यंत चांगला concept आहे. म्हणजे मी त्यांचा मार्केटींग एजंट आहे असा गैरसमज करुन घेउ नका. माझ्या मनात व्हायरस-अँटीव्हायरस दोघांनाही समान स्थान आहे. अर्थात हे माझे वैयक्तिक मत आहे. [अँटीव्हायरस च्या सुरक्षाकवचात माझा डेटा सांभाळुन ठेवल्यानंतर व्यक्त केलेले]. अँटीव्हायरस जर व्हायरस ला किल करणार असेल तर मग दोघांमधे फरक काय राहीला. अशाने सगळी मेमरी free राहण्याचा धोका संभवतो.

तिनः
आमच्या कडे PC वगैरे काही नाही, त्यामुळे अँटीव्हायरस-व्हायरस याच्याशि माझा कधी संबंध आलाच नाही. आणि मुद्दाम काही जाणुन घेण्याचा मी कधी प्रयत्न ही केलेला नाही. पण प्रश्ण उपस्थित झाला आहे तर माझे उत्तर तयारच आहे. अँटीव्हायरस चे जर काही उद्दीष्ट असेल तर व्हायरस चे पण काही उद्दीष्ट आहे. आणि ते एकमेकांशी जुळत नाही म्हणुन एकाला वाईट म्हणुन दुसर्‍याला चांगले म्हणण्याचा अधिकार तुम्हाला मिळत नाही. ही आपापल्या अस्तित्वासाठी केलेली धडपड आहे असे मला वाटते.

चारः
मला असे वाटते, व्हायरस ला जे जमले ते अँटीव्हायरस ने आधी करुन दाखवावे आणि मग प्रश्ण विचारावे. व्हायरस किती नकळत तुमच्या PC मधे येतात, तिथलेच होउन रहातात, अगदी तिथल्या प्रत्येक फाईल शी इतके एकरुप होतात की त्यांची छाप पावलो-पावली दिसते आणि हे सगळे 'विना' मोबदला. दाखवा असा एकतरी अँटीव्हायरस विनामोबदला तुमच्या PC चे रक्षण करणारा, आणि मग बोला. शिवाय आहेच सारखे, हे ब्लॉक, ते ब्लॉक, कुणाला हे आपले मानायलाच तयार नाहीत. अँटीव्हायरसला जे जमत नाही ते व्हायरस अगदी सहज करत असल्याने हा सगळा आरडा-ओरडा आहे.

पाचः
मला थोडे सविस्तर बोलायचे आहे. अँटीव्हायरस हा जसा एक प्रोग्राम आहे, तसाच व्हायरस हा सुद्धा एक प्रकारचा प्रोग्रामच आहे. त्यामुळे दोन्ही प्रकार रन करण्यासाठी PC चा वापर होणे अटळ आहे. अँटीव्हायरस तयार करण्यासाठी जसे कष्ट आणि पैसा लागतो, तसेच व्हायरस तयार करण्यासाठी पण कोणीतरी पैसे आणि कष्ट वापरले आहेत. आणि कुठलीही निर्मीती ही कधिच वाईट नसते. व्हायरस जर कुठलीही जाहीरातबाजी करत नसेल तर अँटीव्हायरस ने पण विनाकारण प्रक्षोभक जाहीराती करुन समाजमना वर ताण येईल असे काही करु नये. शिवाय मुख्य मुद्दा हा आहे, PC मधे स्टोअर केलेला डेटा जर काही हरकत घेत नसेल तर स्वताला अँटीव्हायरस म्हणवणार्‍यांना हा अधिकारच नाही.

सहा:
माझ्या मशिन मधे मी व्हायरस ला राहू तरी देईन का, शक्यच नाही, ज्याच्या पासुन माझ्या 'अत्यंत' महत्वाच्या डेटा ला 'प्रचंड' धोका आहे, माझा अनेक वर्ष मेहनत करुन तयार केलेला डेटा नष्ट करण्याच्या आणि केवळ याच हेतुने ज्याची निर्मीती झाली आहे त्या व्हायरसला माझ्या पिसी मधे काही स्थान असु तरी शकते का, कधिच नाही. त्याउलट जो माझ्या PC चे, डेटा चे रक्षण करणार आहे त्या अँटीव्हायरस साठी मी नक्कीच चार पैसे खर्च करुन, तो व्यवस्थित इनस्टॉल होण्यासाठी आवश्यक ते कष्ट घेउन निर्धास्त मनाने रहाणे पसंत करेन. आणि हेच अधिक सयुक्तिक आहे असे मला वाटते.

........... जुळते आहे ना एक तरी उत्तर तुमच्या उत्तराशी ! माझेही !! स्मित

व्हायरस 'क्लिन' करायला अँटीव्हायरस पाहिजेच्-पाहिजे, मग तो क्विकहील असेल, मॅकअफी असेल, सिमँटेक असेल किंवा एखादी हिंदुत्ववादी संघटना.

इतके साधे आणि सरळ आहे सगळे. मग प्रश्न पडतातच कसे, असा माझा प्रश्न आहे.


*

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.